Advertisement
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी काल (8 एप्रिल) थेट शरद पवारांच्या
निवासस्थानावर हल्ला केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आणि गुप्तचर
यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित झाले. इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या घरावर
मुंबई सारख्या शहरात हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच
दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने एक मोठं विधान केलं आहे.
हल्ला करायचाच होता तर मातोश्री वर करायला हवा होतं असं राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं आहे.
पुण्यात भाषण करताना आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, परिवहन मंत्री हे शिवसेनेचे आहेत. अनिल परब यांच्याकडे परिवहन मंत्रालय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शरद पवारांसोबत काहीही संबंध नाहीये. शरद पवार जो विषय हाताळत नाहीत त्याबाबत जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्याचा काहींचा हेतू होता.
प्रश्न राज्याचा होता, त्यांना मोर्चाच काढायचा होता, जर तुम्हाला हल्ला करायचा होता तर मातोश्रीवर करायता होता. मग तुम्हाला कळलं असतं की हल्ल्याची किंमत काय आहे.