Advertisement
पुणे : पुण्यातील हांडेवाडीमध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील सर्व सत्ता स्थानक भाजपच्या ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधून पुण्यात येण्यामागचे कारण स्वतःच सांगितलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आपल्याला पुण्यात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूडचे आमदार आहेत. याआधी ते कोल्हारमध्ये पक्षासाठी काम करत होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, 2019 साली चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून संधी देण्यात आली. त्यामुळे स्थानिक नेत्या मेधा कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र आता त्यांनी कोल्हापूरातून पुण्यात येणाच्या कारण स्पष्ट केले आहे.
