Advertisement
मुंबई : पारले-जी बिस्किट माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणं अवघडच आहे. अगदी रोजंदारीवर काम करणारा एखादा कामगार असो, किंवा एखाद्या विमान कंपनीचा मालक असो सर्वच लोक पारले-जीचे चाहते आहेत. या बिस्किटांव्यतिरिक्त पारले कंपनी अन्य अनेक उत्पादनांची निर्मिती करते. यामुळेच पारले हा ब्रँड 2021 मध्येदेखील देशात ‘वेगाने वाढणारा कंझ्युमर प्रॉडक्ट’ ठरला आहे. कांतार इंडियाच्या वार्षिक ब्रँड फुटप्रिंट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेली 10 वर्षं सलग पारले हा ब्रँड टॉपवरच राहिला आहे.
कंझ्युमर रीच पॉईंट (CRP), म्हणजेच सीआरपीच्या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कंझ्युमरने केलेली खरेदी, आणि एका कॅलेंडर वर्षात या खरेदीदारांची फ्रीक्वेंसी किती राहिली या आधारावर सीआरपी ठरवला जातो. कांतारच्या ब्रँड फुटप्रिंट रँकिंगचं हे 10वं वर्ष आहे. पारलेचा यंदाचा सीआरपी स्कोअर 6,531 मिलियन आहे. या स्कोअरसह पारले सलग दहाव्या वर्षी या यादीत टॉपला आहे.
