Advertisement
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ईडीची कारवाई होईल, असा दावा केला आहे. पण, रोहित पवार यांच्याबद्दल काय होणार आहे, हे भाजपच्या नेत्यांनी आधीच सांगितलं आहे. आता असं असं होणार आहे. भाजपचे काही लोक हे विरोधकांच्या घरावर असं होणार, तसं होणार, असं सांगत आहे. असा एक गट राज्यात आहेत यांना लोकचं धडा शिकवतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ठाण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पवार यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपवर जोरदार टीका केली. कोणाचे खच्चीकरण करता येईल का ईडी लावता येईल का सीबीआय लावता येईल हा सारखे प्रयोग केले जात आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. झारखंडमध्येही आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून आमदारांना आमिष दाखवून सत्ता घ्यायची हे भाजपा करत आहे, अशी टीकाही पवारांनी केली.
