Advertisement
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल काल मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्याबद्दल आपण त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असं विधान केसरकरांनी काल पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या या विधानामुळे सिंधुदुर्गाच्या राजकारणात मोठं धूमशान होताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख राजन तेली यांनी केसरकरांना आवरा, असा इशाराच दिला होता. राणे समर्रथकांनी केसरांवर निशाणा साधायला सुरुवात केलेली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अडचण येते की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. पण या वादात दीपक केसरकर यांनी माघार घेतली आहे. केरसरकारांनी पत्रकार परिषद घेवून आपण यापुढे राणेंविषयी विधान करणार नाही, असं विधान केलं आहे.
