Advertisement
सिंधुदुर्ग : राज्यात संजय राऊत यांच्या ईडीनं कारवाई करत अटक केली आहे. तर दुसरीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर तसेच बंडखोरांवर जोरदार टिकास्त्र केले. २०१४ नंतर आलेले आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवताहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीतमध्ये शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांचा मेळावा घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, इथल्या त्या व्यक्तीबद्दल बोलणार नाही. काही बोललो तर वय काढतात माझं, असा उपहासात्मक टोला देखील लगावला. गद्दार असा शिक्का माथ्यावर घेऊन फिरताहेत. त्या गद्दारांनी इथे यावं आणि ही गर्दी बघावी आणि लोकांच्या मनात काय भावना आहे ती ओळखून घ्यावी, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांना नाव न घेता दिला.
