Advertisement
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी इस्लामपूरच्या रस्त्यावर एसटीचे स्टेरींग हाती घेतले. वाहन चालकाचा अनुभव घेतला. कचेरी चौकात थेट एसटीचे स्टेरिंग हातात घेत एसटी चालवत शहरातून फेरफटका देखील मारला. थेट बस चालवताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
एसटीच्या ड्रायव्हर सीटवर जयंत पाटील बसल्याचे व ते बस चालवत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. एसटी चालक म्हणून अनुभव घेत, एसटी चालकांच्या सोबत यावेळी त्यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटील यांनी एसटीची माहिती घेतली. तर चालक म्हणून एसटी चालवण्याचा अनुभवही घेतला. विशेष म्हणजे शहराच्या मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवताना पाहून अनेकांनी त्यांचे फोटो आपल्या माबाईल मध्ये काढले.
