#

Advertisement

Tuesday, September 27, 2022, September 27, 2022 WIB
Last Updated 2022-09-27T12:04:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

स्कूल बस दरीमध्ये गेली ; 44 विद्यार्थी जखमी

Advertisement

पुणे:  आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत. 
पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. मात्र, याचदरम्यान, ही बस दरीमध्ये गेली. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक वर्ग होता. सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. तर 4 मुले मंचर येथे पाठवण्यात आली आहे. बचाव कार्य करण्यात आलेले असून सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच व वैद्यकीय सुविधा देण्याचे काम सुरू आहे. 
जिल्हाधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपत्कालीन सेवा आणि रुग्णालयांच्या संपर्कात आहोत. आम्ही आवश्यक ती सर्व मदत करत आहोत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.