#

Advertisement

Saturday, September 17, 2022, September 17, 2022 WIB
Last Updated 2022-09-17T12:02:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसमध्ये परत एक नवीन वाद.....

Advertisement

नागपूर : काँग्रेस मध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही निवडणूक प्रक्रियेने होत असेल तर मग प्रदेशाध्यक्ष पदाची पण निवडणूक घ्या? अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये परत एक नवीन वादाला तोंड फुटले आहे. 
महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट लक्ष्य केलं आहे. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील निवडला जाणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेतच प्रदेशाध्यक्षाची निवड देखील निवडणुकीच्या प्रक्रियेने व्हायला पाहिजे, अशी मागणी करत देशमुख यांनी केली आहे.  त्यांना विचारले असता, नाना पटोले यांना बाजूला सारून प्रदेशाध्यक्ष पदासाठी देखील निवडणूक घ्यायची का ? तर नाना पटोले हे नेमलेले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना कधीही काढून फेकता येते या शब्दात त्यांनी याचं उत्तर दिलं.