#

Advertisement

Friday, September 30, 2022, September 30, 2022 WIB
Last Updated 2022-09-30T11:27:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खासदार सुळे यांनी दिला जुन्या चालीरितींना फाटा

Advertisement

उस्मानाबाद : पुरोगामी महाराष्ट्रात विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात विधवा महिलांना बाजूला ठेवण्याच्या जुन्या रितीरिवाजाला गेल्या काही दिवसांपासून फाटा देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी विधवा महिलांना सुवासिनींचा मान देण्यात आल्याचे आपण पाहिलं असेल. याद्वारे जुन्या चालीरितींना फाटा देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अशाच सामाजिक बदलाचा एक किस्सा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. हे स्वागत एका विधवा महिलेच्या हातून झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या घरी भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी वसंतराव नागदे यांच्या मुलाचं निधन झालं होतं. यावेळी वसंतराव नागदे हे मुलाच्या निधनाचं दुःख पचवून ते सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वसंतराव नागदे यांच्या सुनेच्या हस्ते सुप्रिया सुळेंचे स्वागत करण्यात आलं. यावेळी नागदे यांच्या सुनेला अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वसंतराव यांचे कौतुक करत त्यांच्या सुनेला धीर दिला.