#

Advertisement

Monday, September 19, 2022, September 19, 2022 WIB
Last Updated 2022-09-19T11:33:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या रशिया दौऱ्याकडे त्यानंतरच आम्ही सन्मानाने पाहू

Advertisement

बहुजन रयत परिषद विदर्भ प्रदेश अध्यक्ष अजय डोंगरे यांनी केले स्पष्ट
वर्धा : आंतरराष्ट्रीय दर्जाचे अण्णा भाऊंचे स्मारक महाराष्ट्रात उभारण्यासाठी जागा दिली जाईल, निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि हे कार्य ज्यावेळी राज्य सरकार तातडीने आमलात आणेल त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रशिया दौऱ्याकडे आम्ही सन्मानाने पाहू. रशियाच्या सरकारला अण्णा भाऊंच्या कार्याची महती समजते तीच आपल्या राज्य सरकारलाही समजायला हवी, अशी अपेक्षा बहुजन रयत परिषद विदर्भ प्रदेश अध्यक्ष अजय डोंगरे यांनी व्यक्‍त केली.
वर्धा येथे "जयघोष अण्णा भाऊं'चा या कार्यक्रमात अध्यक्ष डोंगरे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन वर्धा बहुजन रयत परिषद महिलाध्यक्षा उदृघाटक हिराताई खडस, सामाजिक कार्यकर्ते संजय तिळले, दिनेश खडसे, बहुजन रयत परिषदेचे उपाध्यक्ष ओम बावणे, बहुजन रयत परिषद देवळी तालुका अध्यक्ष विनोद आमटे, वर्धा तालुकाध्यक्ष प्रशांत डोंगरे यांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बहुजन रयत परिषद विदर्भ प्रदेश अध्यक्ष अजय डोंगरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई ही जेव्हा गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होत होता तेव्हाही अण्णाभाऊंनी संपूर्ण मुंबईकरांना चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करीत मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. अण्णा भाऊंचे कार्य मोठे होते हे सातासमुद्रापार असलेल्या इतर देशाच्या सरकारला कळते पण आपल्या राज्य सरकारला हे लक्षात येत नाही, याची खंत वाटते, असेही डोंगरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी चंद्रकांत तिळले, पेंटर बाबाराव काळे, अमित वानखेडे, सुनिल पोटफोडे, किशना पोटफोडे, किसना शिकरे, गजू वानखेडे, रमेश वानखेडे, अमित वानखेडे, संजय बावणे, दिलीप वानखेडे, बबलू वानखेडे, गजानन वानखेडे, श्रीरंग खडसे, आशय वानखेडे, राजू वानखेडे, मायाताई खंडारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.