Advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध कार्यक्रम तसेच पुतळ्यांचे उद्घाटन होणार होते. परंतु, मंत्री विखे येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अहिल्याबाईं होळकर यांच्या या पुतळ्यास माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निधी असल्याचे सांगत पुतळ्याचे उद्घाटन केले.
सोलापूर आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. विखे पाटील यांच्या हस्ते आज सोलापूर जिल्ह्यात विविध पुतळ्यांच्या कामाचे उद्घाटन होणार होते. परंतु, ते येण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी उद्घाटन केल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे. माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कामासाठी निधी आणि सुशोभिकरणासाठी निधी दिला होता. यांच्या कार्यकाळात सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आणि तात्कालीन पालकमंत्री भरणे यांनी एक कोटी रुपये निधी सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता. सत्तांतर झाल्यानंतर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच सोलापुरात येणार होते. याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसराचे सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु त्या अगोदरच राष्ट्रवादी आणि धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने उद्घाटन करण्यात आले.द
रम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात हा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ होणार होता. ज्या माजी दत्तात्रय भरणे यांनी निधी मंजूर केला त्या कामाचे उद्घाटन भाजपचे पालकमंत्री करत असून, याचे सर्व श्रेय नूतन पालकमंत्री घेत आहेत असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
