#

Advertisement

Monday, October 3, 2022, October 03, 2022 WIB
Last Updated 2022-10-03T12:44:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत...

Advertisement

पुणे : शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता अंधेरी पूर्वमध्ये पहिली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि शिंदे गटामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.
अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार  आहे, अशी घोषणाच शरद पवार यांनी केली. तसंच, 'राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.  एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पहा', असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे गट आणि शिवसेनेला दिला.
एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते, 2014 ला शिवसेनेसोबतच्या सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोललल्याचं मला तरी माहिती नाही, असंही पवार म्हणाले.