Advertisement
वसुंधरा महाविद्यालयात सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन
सोलापूर : बैठकातून मंथन होते, चर्चेतून संवाद घडतो. इतरांशी तुलना होते. स्पर्धेत आपण कुठे आहोत याची जाणीव होते. कामकाजाचे नियंत्रण करून शासन निधीचा योग्य वापर करताना लोकाभिमुख शिक्षण संस्था निर्माण करणे हे संस्थेचे वैशिष्ट्य उद्दिष्ट असले पाहिजे. यामध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक यांची महत्त्वाची भूमिका असून चांगला शिक्षकच शाळेची गुणवत्ता ठरवतो, हे समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ऍड. कोमल साळुंखे यांनी केले.शाहू शिक्षण संस्थेच्या वसुंधरा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळा व सहविचार सभेत त्या बोलत होत्या. लोकाभिमुखता आणि लोकसहभाग हे कोणत्याही चांगल्या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. यामध्ये शाळेतील शिपाई ते अगदी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण, चांगले शिक्षक हिच शाळेची गुणवत्ता ठरते. आज, आपल्या शिक्षण संस्थेला वेगळी परंपरा आहे, संस्कृती आहे. ती जपली गेली पाहिजे, असे आवाहनही ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले.
यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, सचिव सिद्धाराम जावीर, संचालक विजय पोटफोडे, क्रांतीताई आवळे, शारोन ढोबळे, डॉ. नारायण पाटोळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी शिक्षणाविषयी सद्यस्थितीबद्दल मनोगत व्यक्त करताना म्हटले की, काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार नवीन शैक्षणिक धोरण राबविले जात आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित शिक्षण घेऊन नवी उभारी घ्यावी लागेल. याप्रसंगी शाहू शिक्षण संस्थेच्या प्रशासन अधिकारी क्रांतीताई आवळे यांनी बदलत्या शिक्षणाबद्दल वैचारिक मंथन घडवून सकारात्मक दृष्टीने सामोरे जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, सूत्रसंचालन डॉ. तानाजी देशमुख, प्रा. प्रदीप कोल्हे यांनी आभार मानले.

मान्यवरांचा विशेष सत्कार
बेळगाव, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा पुरस्कार वितरण समिती बेळगाव यांच्याकडून शाहू शिक्षण संस्थेला "आंतरराज्य आदर्श शिक्षण संस्था' पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, राज्यस्तरीय डॉ. कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा सन्मान पुरस्कार ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांन मिळाल्याने, वसुंधरा महाविद्यालयास नॅंककडून "ए' दर्जा मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीना गायकवाड तर आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक पोतदार याम मान्यवरांचा विषय सत्कार यावेळी करण्यात आला.


