#

Advertisement

Saturday, October 8, 2022, October 08, 2022 WIB
Last Updated 2022-10-08T11:47:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला ?

Advertisement

मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणच्या बाजूला जाईल याबाबतचा अंतिम निर्णय आज होऊ शकतो. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट दोघांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने तातडीची बैठक बोलावली आहे. 
निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दोन्ही बाजूने कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या चिन्हाबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतो याकडे राज्याचं लक्ष आहे. कारण या निकालाने राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम पडण्याची दाट शक्यता आहे. 
शिवसेना आपली असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जातो आहे. शिंदे गटाने तर 40 आमदार, 12 खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने त्याबाबतचे कायदेशीर पुरावे देखील निवडणूक आयोगाकडे देखील सादर केले आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील काही कागदपत्रे जमा करण्यात आले आहे. दोन्ही बाजूने आपापली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आणखी वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळत आज दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाने काल जबाब नोंदवला होता. तर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने जबाब नोंदवला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. या बैठकीनंतर कदाचित पुन्हा एकदा नोटीस बजावली जाऊ शकते.