Advertisement
खासदार धैर्यशील माने यांचे बहुजन रयत परिषदेतर्फे मानण्यात आले आभार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील मान यांच्या पाठपुराव्यातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्व विकासकामांना मुख्यमंत्र्याकडून हिरवा कंदील देण्यात आल्याने धैर्यशील माने यांनीही समाधान व्यक्त केले. तर, या विकासकामांमध्ये वाटेगाव मधील अण्णाभाऊ साठे स्मारकासही मुबलक निधी मंजूर झाल्याने याबाबत बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे तसेय अजय साळुंखे यांनी माने यांचे आभार व्यक्त केले.खासदार धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतील आनंद मार्ग या मॉडेलला लोकसभा मतदारसंघातील 12 नगरपालिकेंना प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी मंजूर. तसेच, इचलकरंजी ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी क्लस्टर स्थापन करणार, इचलकरंजी मध्ये ईटीपी प्लॅनट तयार करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करण्यासाठी एमआयडीसीला तात्काळ निर्देश देण्यात आले आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आकृतीबंधस तत्वता मंजुरी दिली गेली आहे.
इचलकरंजी मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी निधी मंजूर झाला आहे, याशिवाय शहर सेफ सिटी करण्यासाठी सीसीटीव्हीच्या तिसऱ्या टप्प्यास मंजुरी देण्यात आली आहे. जीएसटी अनुदानात इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या डिजिटल शाळांना साठी दुसऱ्या टप्प्यास मंजुरी. तसेच इचलकरंजी महानगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहास मंजुरी देण्यात आली आहे. न्याय संकुलाच्या जागेचा प्रश्नमार्गी लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन हाफ तयार करण्यात येणार आहे, शिवस्वराज्यभवन दुसऱ्या टप्प्यास मंजुरी, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व पानंद रस्त्यांना मंजुरी, अल्पसंख्यांक खात्यातील सर्व कामांना मंजुरी, वस्त्रोद्योगाला दोन महिन्याच्या पोकळ थकबाकीला मान्यता मंजुरी मिळाली आहे.
