#

Advertisement

Thursday, November 10, 2022, November 10, 2022 WIB
Last Updated 2022-11-10T12:13:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला ; मनसेचा राऊतांना टोला

Advertisement

मुंबई :   तुरुंगातून बाहेर येताच.., आता बाहेर आलो आहे बघू, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला. त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबतच मनसेवर देखील हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या या टीकेला मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता असं काळे यांनी म्हटलं आहे. 
मनसने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सूर बदले बदले है जनाब के, राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील,  असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे. 
पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी मनसेवर देखील हल्लाबोल केला. राज्यात शिवसेना एकच आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये मला पक्षाने भरभरून दिलं. त्यामुळे पक्षाच्या पाठित कधीही खंजीर खुपसरणार नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे. मी एकटा नाही माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत. आदित्य ठाकरे आता मशाल पुढे घेऊन जातील असंही यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.