#

Advertisement

Wednesday, November 9, 2022, November 09, 2022 WIB
Last Updated 2022-11-09T12:09:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

बहुजन रयत परिषदेच्या अध्यात्म सप्ताहास येणार कर्नाटक, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्री

Advertisement


पंढरपूर : बागलकोट जिल्ह्यातील श्री क्षेत्र हिप्परगी इंचगिरी मठ येथे महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेच्या वतीने अध्यात्म सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्यासह मान्यवर उपस्थिती राहणार असल्याचे बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशराध्यक्ष ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे साळुंखे यांनी सांगितले.
इंचगिरी अध्यात्म सांप्रदायाचे श्री स.स. गिरी मल्लेश्वर महाराज यांचे परम शिष्य श्री स.स. संगमेश्वर महाराज यांच्या 91व्या पुण्यस्मरणोस्तव अध्यात्म सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा कार्तिक वद्य चतुर्थी शनिवारी (दि.12) इंचगिरी सांप्रदायाचे सदगुरु श्री. स.स. प्रभुजी महाराजांच्या हस्ते दासबोध विना पूजन करून या सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री महोदय आणि मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.
या सांप्रदायिक सोहळ्यासाठी सोलापुरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी श्री स.स. अदृश्‍य काडसिद्धेश्वर महाराज, श्री सिद्धेश्वर बाळासाहेब महाराज, दत्तात्रय बडे महाराज, देविदास महाराज, खताळ महाराज, तुकाराम वाघमारे महाराज, बंडोपंत महाराज, प्रभू अकळे महाराज, काटकर महाराज, मिराताई महाराज, मोहनानंद महाराज, आनंदसिद्ध महाराज, भिमा महाराज, सच्चिदानंद महाराज, दयाघन महाराज, शंकर महाराज, शिवानंद पोरे महाराज, रेवनसिद्ध व्हनमराठे महाराज, अरविंद महाराज, महिपति मोरे महाराज, पुंडलिक साठे महाराज, तानाजी फुले महाराज, श्री स.स. शिवाजी महाराज, श्री स.स. सुदर्शन महाराज आदि उपस्थित राहणार आहेत. कार्तिक वद्य सोमवार (दि.14) दुपारी 12 वाजता विमल ब्रम्ह निरुपन व फुले टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्व भाविकांनी या अध्यात्म सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.