Advertisement
सातारा : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यापालांविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज भाजप खासदार उदयनराजे यांनी सर्वाधिक आक्रमक घेतली. शिवरायांची बदनामी थांबवावी अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल, अशा थेट इशारा उदयनराजे यांनी दिला होता. यावर उदयनराजे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितल.
खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच आपण उद्या रायगडावर जात आहोत, असे सांगितले. पुढे ते म्हणाले की रायगडावर आपल्याला शिवप्रेमी मिळतील. तिथे ते मेळाव्याला संबोधित करतील आणि त्याच वेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
