#

Advertisement

Tuesday, January 24, 2023, January 24, 2023 WIB
Last Updated 2023-01-24T11:05:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अजितदादा निघाले 'मातोश्री'कडे, 'वंचित'वर करणार चर्चा !

Advertisement

 पुणे : शिवसेनेनं वंचित आघाडीसोबत युती केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वंचितला विरोध होता पण उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज त्यांची भेट घेणार आहे. वंचितसोबत संबंध जुळले तर पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधानही अजितदादांनी केलं.
वंचित आघाडी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, जागवाटपावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे. अजित पवार यांनी शिवसेनेनं आपल्या कोट्यातून जागा द्यावी अशी भूमिका घेतली होती. तर उद्धव ठाकरेंनी वंचित महाविकास आघाडीचाच घटक असणार आहे, असं स्पष्ट केलं. 
आज आमच्या बैठकीमध्ये पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुकीवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही विषयावर चर्चा करणार आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत ताकद उद्धव ठाकरे यांची आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.