#

Advertisement

Tuesday, January 24, 2023, January 24, 2023 WIB
Last Updated 2023-01-24T11:35:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

अश्लील डान्स स्टेपमुळे गौतमी पाटील पुन्हा अडचणीत; गुन्हा दाखल होणार?

Advertisement

सातारा : सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालणारी प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हिच्याविरुद्ध थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सातारा कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी देखील गौतमी पाटील हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची करण्यात आली होती. मात्र, आता थेट न्यायालयातर्फे गौतमी पाटीलविरुद्ध कारवाई करण्याची करण्यात आली आहे. 
गौतमी पाटील हिच्या विरोधात कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, या मागणीचा अर्ज सातारा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी हा अर्ज दाखल केला आहे. शेंद्रे-सोनगाव येथे 21 डिसेंबरला लावणी कार्यक्रमात पार पडला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने अश्लिल नृत्य केल्याचा आरोप आहे.
या लावणी कार्यक्रमात गौतमी पाटीलने नृत्य सादर करताना वारंवार अश्लील चाळे केले. सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी गौतमी पाटीलविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 294 गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रतिभा शेलार यांनी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर 23 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.