Advertisement
मुंबई : न्यूझीलंड संघ सध्या भारत दौऱ्यावर असून यांच्यात सध्या वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा युवा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध द्विशतक ठोकले आहे. आज हैद्राबाद येथे वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. अतिशय अतितटीच्या या सामन्यात भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याने द्विशतकीय कामगिरी केली. शुभमन गिलचे वनडे सामन्यातील हे सलग तिसरे शतक असून त्याने पुन्हा एकदा त्याची प्रतिभा सिद्ध केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकत भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताची फलंदाजीची सुरुवात फार काही चांगली राहिली नाही. सलामीसाठी आलेला कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात असूनही 38 चेंडूवर 34 धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयन्त केला, परंतु विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तर दिग्गज खेळाडू विराट कोहली देखील 10 चेंडूत अवघ्या 8 धावांची कामगिरी करून माघारी परतला. यावेळी शुभमनने भारतीय संघाचा डाव सावरला आणि केवळ 88 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.
