Advertisement
पुणे : कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिकृत सुरूवात झाली आहे. भाजपच्या हेमंत रासने आणि काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांचा अर्ज भरण्यात आला आहे. हा अर्ज भरताना दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन ही करण्यात आलं. यासोबतच संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी , ब्राह्मण महासंघ ही उमेदवारी दाखल करणार आहेत.
बिनविरोध निवडणूक होईल असं वाटत असतानाच काँग्रेसने प्रदेशाच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शकातीप्रदर्शन केलं. भाजपने ही शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे, त्यामुळे सहानुभुतीच्या लाटेवर होणारी निवडणूक अचानक चुरशीच्या वाटेवर निघाली आहे. काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर हे बंडखोरी करतील असं चित्र आहे, असं जरी असलं तरी थेट लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच असेल हे स्पष्ट झालंय. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने कुटुंबिय नाराज आहेत, त्यामुळे ते रासने यांचा अर्ज भरताना ही अनुपस्थित राहिले.
ब्राह्मण उमेदवार न दिल्याच्या निषेधार्थ ...
आज सकाळी कसब्यात अनेक ठिकाणी पाट्या लावण्यात आल्या होत्या आणि भाजपला मतदान का करायचं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र कसबा विधानसभेत ओबीसी मराठा आणि मुस्लीम यांच्या मतांची टक्केवारी तब्बल 66 टक्के इतकी आहे आणि याचाच विचार करत भाजपने ओबीसी चेहरा देण्याचा निर्णय घेतलाय. तर काँग्रेसने मराठा उमेदवार दिलाय. महत्वाची नोंद म्हणजे गेली 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व ब्राह्मण आमदाराने केलंय.
कसबा पेठेचं जातीय समिकरण
मराठा : 23.85 %
ओबीसी : 31.45 %
मुस्लीम : 10.5%
दलित : 13%
ब्राम्हण : 13.25%
इतर: 7.1%
