#

Advertisement

Monday, February 20, 2023, February 20, 2023 WIB
Last Updated 2023-02-20T11:46:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात ?

Advertisement

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने अधिवेशनाची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप बजावला जाणार आहे. हा व्हीप आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे जर व्हीप स्वीकारला नाहीतर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. सर्व 56 शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हा व्हीप बजावला जाईल. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून हा व्हीप असणार आहे. हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू असणार आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर जे आमदार निवडून आले त्या सगळ्या आमदारांना हा व्हीप लागू होईल. जर कुणी व्हीप पाळला नाहीतर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशाराच गोगावले यांनी दिला. यामुळे ठाकरे गटातील आमदार शिवसेना शिंदे गटाचा व्हीप माननार की धुडकावणार यावरुन राजकारण तापणार आहे.