#

Advertisement

Saturday, February 4, 2023, February 04, 2023 WIB
Last Updated 2023-02-04T11:57:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

नाना गायकवाड यांच्यावर कारागृहात हल्ला

Advertisement

पुणे : पिंपरी-चिंचवडचे उद्योजक नाना गायकवाड यांच्यावर कारागृहात हल्ला झाला आहे. गायकवाड सध्या येरवडा कारागृहात मोकाअंतर्गत शिक्षा भोगत आहेत. सोलापूरमधल्या एका आरोपीने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.  नाना गायकवाड मोकामधील आरोपी आहे आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्यावर आज येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला. सोलापूरच्या गँगवार मधील देवा या नावाच्या आरोपीने नाना गायकवाड याच्यावर हा हल्ला केल्याचे समजत आहे. नेमकं या दोघांमध्ये काय वाद झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.