#

Advertisement

Saturday, March 18, 2023, March 18, 2023 WIB
Last Updated 2023-03-18T16:42:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

जागा वाटप फॉर्म्युला..., बावनकुळेंची पलटी...

Advertisement

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे, त्यामुळे तयारीला लागा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र, यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याने बावनकुळे यांनी आपल्या विधानावरुन पलटी मारली आहे. शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की किती जागा लढवणार याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही, असे स्पष्टीकरणच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
बावनकुळे यांनी भाजपच्या एका खासगी कार्यक्रमात शिवसेना-भाजपमधील संभाव्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. 2024 मध्ये भाजपचे 150 ते 170 आमदार 100 टक्के निवडून येतील. आपण 240 च्या आसपास सीट लढण्याच्या विचारात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 50 पेक्षा जास्त आमदारच नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले. अवघ्या काही तासांमध्ये बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.