#

Advertisement

Wednesday, March 22, 2023, March 22, 2023 WIB
Last Updated 2023-03-22T13:10:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

लक्ष्मणराव ढोबळे म्हणतात.., ही तर विजयाची गुढी

Advertisement

सोलापूर : आज गुढीपाडव्याचा सण... राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक मातब्बरांनी साखर गाठीची गुढी उभारली. मात्र, सोलापुरात एका गुढीची चर्चा अधिक रंगली होती. कारण, लोकसभेच्या पराभवानंतर अलिप्त राहिलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आता राजकारणात पुन्हा सक्रीय होऊ पाहत असताना माजीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनीही आता आक्रमक भूमिका घेत आगामी निवडणुकीची आखणी, बांधणी केली आहे. हे दोघे ज्येष्ठ नेते सोलापूर लोकसभेसाठी एकमेकां विरोधात उभे राहण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. आज, ही लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या निवासी गुढी उभारताना ही विजयाची गुढी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांची चिरंजीव अभिजीत ढोबळे सपत्नीक उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे मागील दोन-अडीच वर्षात विजनवासातच होते, पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. यामुळे ते सोलापूर लोकसभा मतदार संघात सक्रिय नव्हेत तसेच पक्ष पातळीवरही ते अलिप्तच होते. सुशीलकुमार यांची भूमिका वेट अँन्ड वॉच अशीच राहिली. त्यांनी सोलापूरला येणे देखील कमी केले. त्यांनी राजकीय सेवानिवृत्ती घेतली की काय? अशी चर्चा सुरू असतानाच यंदाची लोकसभा निवडणूक शिंदे लढविणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. परंतु, या मध्यंतरीच्या काळात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघावर चांगलीच पकड मिळवली, गेल्या तीन-चार वर्षांत त्यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून अनेक स्थानिक निवडणुकां जिंकण्यात मोठा वाटा उचलला आता आगामी काळात तेच शिंदे यांच्या विरोधात लोकसभा लढवतील असे सुतोवाच केले जात आहे, त्यातच आजच्या गुढी उभारण्याच्या वेळी त्यांनी ही तर विजयाची गुढी, असा केलेला उल्लेख बरेच काही सांगून जाणारा आहे.