Advertisement
मुंबई : मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजितहे पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले होते. त्यांची बैठक पूर्ण होत नाही तेच भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा तिथे पोहोचले.
अजित पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिले होते. त्यानंतर आज अजितदादा भेटीला आले होते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीवर मदतीबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. जवळपास अर्धा तास ही बैठक पार पडली.
दरम्यान, ही बैठक सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले होते. राणेंची एंट्री झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपवून बाहेर निघाले होते.
