#

Advertisement

Monday, April 17, 2023, April 17, 2023 WIB
Last Updated 2023-04-18T04:53:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

" मातोश्री"वरही घडामोडींना वेग

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवरही घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीहून काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. 
या भेटीसाठी केसी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार आहे.