#

Advertisement

Saturday, April 22, 2023, April 22, 2023 WIB
Last Updated 2023-04-22T13:10:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महात्मा बसवेश्वर यांची जयंती पहिल्यांदा साजरी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

Advertisement

 इचलकरंजी :  कर्नाटक शासनस्तरावरुन महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून दि. 26 एप्रिल 2001ला पहिल्यांदा शासकीय जयंती साजरी करण्यास राज्यात सुरूवात झाली. महाराष्ट्र राज्याचा आदर्श घेत राज्याच्या शेजारील कर्नाटक राज्यात 2002, तेलंगणामध्ये 2003 तर आंध्र प्रदेशामध्ये 2016 मध्ये महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करण्याची सुरूवात करण्यात आली असून महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याचा गौरव राज्या-राज्यांत करण्यात येत असल्याने याचे समाधान वाटते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये भाजपचे प्रांतिक सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी माजी मंत्री ढोबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्य व सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देऊन जातीभेद आणि धर्मांधता नष्ट करण्याबरोबरच स्त्री शिक्षण आणि समानता या विषयात त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्‍यात आढावा ढोबळे यांनी घेतला. जीवनात कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्परता याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती होते यासाठी प्रामाणिक कार्य करत राहावे ही शिकवण महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यातून मिळत असल्याचेही सांगितले.
यावेळी इंचलकरंजी परिसरातील भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून सरबत वाटप करण्यात आले. माजी मंत्री ढोबळे यांनी स्वत: या उपक्रमात सहभागी होत हजारो नागरिकांना सरबताचे वाटप केले.