#

Advertisement

Friday, May 19, 2023, May 19, 2023 WIB
Last Updated 2023-05-19T10:53:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मणराव ढोबळे यांनी नव्या कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली

Advertisement

संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर यांचे प्रतिपादन


मंगळवेढा : माजी आमदार, माजी मंत्री ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी बळ दिल्यानेच तालुक्‍याच्या राजकारणात प्रस्थापितांविरोधात नव्या कार्यकर्त्यांची मोठी भक्कम फळी तयार झाली आहे, योग्य वेळी ढोबळे यांची ही ताकद समोर दिसेलच, असे प्रतिपादन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी केले.
सोलापूर जिल्ह्याचे शब्दप्रभू म्हणून परिचीत असलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार समारंभाचे अयोजन शाहू शिक्षण संस्था, बहुजन रयत परिषद व सावली फाउंडेशन यांच्या वतीने मारुतीच्या पटांगणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी जाहीर सत्कार समारंभात वाडदेकर बोलत होते.
वाडदेकर म्हणाले की, तालुक्‍यात शेतीकारणाला बळकटी देण्याचे काम करताना 112 कि.मी.वर संपलेला उजनी कालवा वाढवण्यासाठी ढोबळे यांनी आपली आमदारकी पणाला लावली आणि तो कालवा 132 कि.मी.पर्यंत वाढवण्याचे काम केल्याने तालुक्‍यातील शेती उजनीच्या लाभक्षेत्रात येऊन बहरलेली आहे. यामुळेच आज तालुक्‍याचय अर्थकारणाला मोठी गती मिळाली आहे. राजकारणापेक्षा शेतीकारणाला महत्त्व देणारे नेते म्हणून ढोबळे यांचे नाव घ्यावे लागते. आज, त्यांच्याकडेच पाहून राजकारणात नवी पिढी सक्रीय झाली आहे, तालुक्‍यात ढोबळे यांची युवा कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे.
यावेळी व्यासपीठावर बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे, रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, भुजंगराव पाटील, अरुण किल्लेदार, नितीन काळे, डी. सर्वगौड, 'दामाजी'चे संचालक भारत बेदरे, ज्ञानेश्वर भगरे, महादेव जाधव, रमेश गालफाडे, अजय साळुंखे, हजरत काझी, विशाल खंदारे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमांचे आयोजन
वाढदिवसानिमित्त ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित "वास इस दास' या प्रबोधनात्मक नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. याशिवाय नामवंत कवींचे कवी संमेलन घेण्यात आले. दिवसभर मंगळवेढा शहरामध्ये 20 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांना मदत केलेल्या अनेक जुन्या कार्यकत्यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांचा सत्कार केला. याशिवाय अन्नदान, वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.