#

Advertisement

Saturday, June 3, 2023, June 03, 2023 WIB
Last Updated 2023-06-03T09:47:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का

Advertisement

 मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाल्यानं याचा फटका हा ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाला आणखी एक मोठा दणका देण्यात आला आहे. शुक्रवारी ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे  माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील महापौर निवासाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे  माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या शेकडो समर्थकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला.