#

Advertisement

Saturday, July 29, 2023, July 29, 2023 WIB
Last Updated 2023-07-29T11:45:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'राहुलचं लग्न करुन टाका'

Advertisement

दिल्ली :  हरियाणामधील काही शेतकरी महिलांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान या महिलांपैकी एकीने, 'राहुलचं लग्न करुन टाका' अशी गळ सोनियांकडे घातली. या महिलेनं मुलाबद्दल केलेलं हे विधान ऐकून सोनिया गांधींनीही या महिलेला 'तुम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधा,' असं म्हटलं. सोनिया गांधींचं हे विधान ऐकून सर्वच महिला हसू लागल्या. काही शेतकरी महिलांनी सोनिया गांधींबरोबरच प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या महिलांना सोनिया गांधींनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान या महिलांना जेवणासाठी घरी येण्यास सांगितलं होतं. आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी राहुल गांधींनी काही महिला शेतकऱ्यांना आपल्या आईच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं. या सर्वांनी मिळून भोजनाचा आस्वाद घेताना बऱ्याच विषयांवर गप्पाही मारल्या.