#

Advertisement

Thursday, August 17, 2023, August 17, 2023 WIB
Last Updated 2023-08-17T13:13:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वाघेबाभूळ गावातील जाधव यांच्या सारख्या माणसांमुळे संघटनेची मूळं घट्टं!

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे प्रतिपादन

बीड : जिल्ह्यात बहुजन रयत परिषदेची सामाजिक चळवळ कायम तेवत ठेवणारे साहेबांचे जुने सहकारी अशोक जाधव यांच्या वाघेबाभूळगाव येथील निवासस्थानी अनेक कार्यकर्ते भेटायला आले. माझा आदर-सत्कार केला. घरातील महिला मंडळींनी खणा-नारळानं ओटी भरली. प्रेमानं बनविलेलं जेवण खाऊ घातलं. मनसोक्त गप्पा मारल्या. जाधव यांनी संघटनेचं काम तळागाळात रुजवले आहे. त्यांनी आपली शेतीही मोठ्या कष्टानं पिकवली आहे. नाती आणि माती समृध्द करण्यासाठी मायेचा हात आणि कष्टाची साथ फार गरजेची असते. ती जाधव यांच्याकडे असल्यानेच त्यांच्यासारख्या माणसांनी संघटनेची मुुळं घट्ट केली आहेत, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अेॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात ऍड. कोमलताई यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुजन रयत परिषदेचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या बरोबर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट ऍड. कोमलताई आवर्जून घेत आहेत.
वाघेबाभूळगाव येथे त्यांनी अशोक जाधव आणि कुटुंबियांची भेट घेतली, या भेटी विषयी सांगतात त्यांनी सदर प्रतिपादन केले. ऍड. कोमलताई म्हणाल्या की, माझे आराध्य आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांनी चाळीस वर्षांपूर्वी बहुजन रयत परिषद नावाचं एक छोटंसं रोपटं महाराष्ट्राच्या मातीत लावलं. एक-एक माणूस जोडत घामाचं शिंपण घालून ते वाढवलं. आज त्याच रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात संघटना पोहोचली आहे. जुन्या-जाणत्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या साथीनं नव्या दमाची, नव्या उत्साहाची, युवाशक्तीची नवी फळी उभी राहिली आहे. हे घडलं ते केवळ विश्वासू आणि संघटनेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जुन्या फळीतील कार्यकर्त्यांमुळे!
बहुजन रयत परिषद, शाहू शिक्षण संस्था आणि सावली फाउंडेशनच्या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरताना साहेबांनी जोडलेली अनेक जुनी माणसं भेटतात. संघटनेच्या कामाबद्दल, साहेबांच्या कार्याबद्दल भरभरून बोलतात. जुन्या आठवणींना उजाळा देतात. अशावेळी वाटतं, केवढी अफाट माणसं होती ही. झपाटल्यासारखे काम करणारी अशी माणसं सोबत होती म्हणूनच संघटनेची मूळं समाजात घट्ट रुजली आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.