#

Advertisement

Wednesday, August 23, 2023, August 23, 2023 WIB
Last Updated 2023-08-23T10:39:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नांदेड बहुजन रयत परिषदेतर्फे "स्पर्धा परिक्षा चर्चासत्र'

Advertisement

 


शहराध्यक्ष भारत कलवले, सचिव प्रा. कदम यांनी दिली माहिती

नांदेड : एमपीएससी, यूपीएससी या सारख्या स्पर्धा परिक्षांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी मागे राहतात, यासाठी त्यांच्यात अशा स्पर्धांना सामोरे जाण्याचा आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, यासाठीचे योग्य मार्गदर्शन नांदेड
बहुजन रयत परिषदेच्यावतीने चर्चासत्राद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन नांदेड बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष भारत कलवले, नांदेड शहर सचिव प्रा. सी. एल. कदम यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परिक्षा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन बहुजन रयत परिषदेतर्फे करण्यात आले आहे. रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता राजयोग पॅलेस, नमस्कार चौक, नांदेड येथे सदर चर्चासत्र, व्याख्यान होणार आहे. राज्यसेवा अकॅडमी पुणेरी पॅटर्न, नांदेडचे प्रमुख प्रा. सज्जन कदम हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात एम.पी., यु.पी.एस.सी., पी.एस., टी.आय., एस.सी., एस.आय., ए.एस.ओ. इतर व परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. माधव बसवंत भूषविणार असतील तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन रयत परिषदचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, बहुजन रयत परिषद महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक ना.म.साठे, प्रदेश सचिव ईश्वर क्षीरसागर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, बहुजन रयत परिषद नांदेडचे जिल्हाध्यक्ष साहेबराव गुंडीले आदी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.