Advertisement
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली. खुद्द संजय राऊत यांनीही पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू, असं म्हटलं. त्यावर आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत वेडा माणूस आहे, सकाळी भुंकण्यासाठी काहीही मुद्दे घेत असतो. संजय राऊत निवडणूक लढवणार असतील. तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एकदा त्यांना त्यांची औकात कळू द्या असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत.
राज्यामधील जनतेने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही, असं वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य योग्य आहे. राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही झाला नाही. जेव्हा होण्याची वेळ आली. तेव्हा ते दुसऱ्या पक्षाला दिलं, शरद पवार यांची महाराष्ट्रात ताकत असली तरी सत्ता हाती आली नाही. हेही तितकंच सत्य आहे, असं संजय शिरसाट म्हणाले