#

Advertisement

Thursday, December 28, 2023, December 28, 2023 WIB
Last Updated 2023-12-28T12:11:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी सहसा जात नाही !

Advertisement

अयोध्ये सोहळ्याच्या आमंत्रणाबद्दल शरद पवार स्पष्टच बोलले
अमरावती : अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र या आमंत्रणावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता या सोहळ्याच्या आमंत्रणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या केलेलं एक विधान चांगलेच चर्चेत आलं आहे.
अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, शरद पवारांना अयोध्येतील सोहळ्याच्या आमंत्रणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्याला या सोहळ्याचं आमंत्रण आलेलं नाही असं म्हटलं. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. मात्र त्याचबरोबर आपल्या धार्मिक भूमिकेबद्दलही त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे. "भाजपा राम मंदिराचे राजकारण करत आहे की व्यवसाय करत आहे, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक," असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना, "अयोध्येत राम मंदिर उभारले गेल्याचा मला आनंद आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मला मिळालेलं नाही," असं शरद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, "पूजा-अर्चा ज्या ठिकाणी होते तिथे मी सहसा जात नाही. प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्याला माझा विरोध नाही," असंही शरद पवार म्हणाले.