#

Advertisement

Friday, December 8, 2023, December 08, 2023 WIB
Last Updated 2023-12-08T11:11:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात सात जणांचा होरपळून मृत्यू

Advertisement

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटलं जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.