#

Advertisement

Sunday, January 14, 2024, January 14, 2024 WIB
Last Updated 2024-01-14T17:25:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरात तिळगूळ वाटपातून लक्ष्मणरावांची कन्या ॲड. कोमलताई यांच्यासाठीची साखर पेरणी भाजपसाठीही गोड

Advertisement

सोलापूर : भाजप सोलापूर लोकसभेसाठी नवा चेहरा देण्याची शक्यता असली तरी अद्याप भाजपने सोलापूरच्या उमेदवारीबाबत भाष्यही केलेले नाही, मात्र माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी संक्रातीचा मुहुर्तावर मोर्चेबांधणी सुरू केल्याचे आज दिसून आले. भाजपची सरळ लढत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याबरोबर होत आहे, त्यामुळे भाजप ही महिला उमेदवार रिंगणात उतरविन्याच्या तयारीत असेल, असा अंदाज बांधला जात आहे. याच कारणाने  लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपली कन्या ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांच्यासाठी साखर पेरणी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. प्रणिती शिंदे यांच्याबरोबर लढत देण्यासाठी सध्या तरी भाजपकडे सक्षम चेहरा नाही, त्यामुळे लक्ष्मणराव ढोबळे यांची

सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेत तिळगूळ वाटपातून ही कन्येसाठीची साखर पेरणी तिळगुळाहूनही गोडच ठरावी, असे म्हंटले जात आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा फब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी करण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची काँग्रेसकडून चर्चा आहे. भाजपने मात्र अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, अनेक उमेदवार तयार आहेत. परंतु, काँग्रेस महिला उमेदवार रिंगणात उतरवत असल्याने भाजपही अशीच काहीशी तयारी करीत असल्याने अद्याप भाजप ने आपला लोकसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता लक्ष्मणराव ढोबळे यांची साखर पेरणी कामास येऊ शकते, कारण ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे या एक सक्षम उमेदवार मानल्या जातात. उच्चशिक्षित आणि समाज जनमानसात मिसळणारे व्यक्तिंमत्व, नवा चेहरा अशा सर्वच बाजू भक्कम आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. सिद्धेश्वर रामेश्वराकडे आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी त्यांनी साकडे घातले. यात भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांचाही सहभाग होता. त्यांनी आपल्या कन्येसह बाराबंदी वेशात अक्षता सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यादरम्यान त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांचीही भेट घेत हितगूज केले.

सोलापूरमधून काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. आता भाजप कुणाच्या नाव जाहीर करणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले असताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी कन्या ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांना पुढे आणले आहे.

दरम्यान, संक्रातीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अक्षता सोहळ्यात ढोबळेंनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या कन्येला उमेदवारीबाबत यंदाची संक्रात गोड ठरणा, अशीच चर्चा सुरू आहे.