#

Advertisement

Thursday, February 8, 2024, February 08, 2024 WIB
Last Updated 2024-02-08T12:29:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हडपसरमधून तुम्ही आरामात निवडून येऊ शकता !

Advertisement

जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर करून टाकला
पुणे : हडपसरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. हडपसरमधून शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल, यावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. एक लक्षात ठेवा…लोकं आजही आपल्यासोबत आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप तुम्ही हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकता, असं म्हणत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे हडपसर विधानसभेचा उमेदवार जाहीर करून टाकला.
हडपसरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. काल पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. इथे बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभेच्या उमेदवारीवर भाष्य केलं.
आपल्याला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील, असं काम करा. याही मतदारसंघात आपला उमेदवार निवडून येणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेली कामं लोकांना सांगा. हडपसर मतदारसंघामधून हा मेळावा होतोय, असं म्हणत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं.