Advertisement
पुणे : शहरात नवीन निर्माण झालेल्या पब संस्कृतीची चर्चा आता जोरात होऊ लागली आहे. पुण्यातील बडे बिल्डरचा अल्पवयीन मुलाने पबमध्ये पार्टी केली. त्यानंतर रस्त्यात दोघांना चिरडले. पुण्यात रात्रभर सुरु असणाऱ्या या पबविरोधात आवाज उठवला जात असताना एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील नामांकित पबमध्ये झालेल्या “पूल पार्टी” चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब संदर्भात आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील भूगाव परिसरात असलेल्या टिपसी टरटलमध्ये रंगली “पूल पार्टी”चा हा व्हिडिओ आहे. पार्टीमध्ये तरुण, तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेधुंद होऊन नाचताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
https://x.com/jitendrazavar?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1793606163160056137%7Ctwgr%5E86805b18a189f5b40b0cd7745cbbb43413dfe524%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fpune%2Fdrunk-youth-pub-in-pune-video-viral-on-social-media-marathi-news-1204017.html
