#

Advertisement

Wednesday, May 8, 2024, May 08, 2024 WIB
Last Updated 2024-05-08T13:32:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Advertisement

शरद पवारांच्या विधानाने खळबळ 
मुंबई : राजकीय भवितव्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भुकंप होण्याची  शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलिन होऊ शकतो अशा चर्चा पवारांच्या या विधानामुळे जोर धरु लागल्या आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर उधाण आलं आहे. शरद पवारांनी या मुलाखतीमध्ये एक सूचक विधान केलं आहे. भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. काँग्रेस आणि आमच्या पक्षात वैचारिक मतभेद नाहीत, असं पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि आम्ही नेहरु-गांधींच्या विचारसरणीचे आहोत, असंही शरद पवारांनी या मुलाखतीत आवर्जून म्हटलं आहे. त्यामुळेच आता भविष्यात शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिन होणार की काय यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.