#

Advertisement

Wednesday, July 31, 2024, July 31, 2024 WIB
Last Updated 2024-07-31T12:31:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात मोची समाजाचे नेते एकवटले

Advertisement

काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणार 
सोलापूर : काँग्रेसच्या  प्रणिती शिंदे यांच्या विजयात या मतदारसंघातील मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शहर मध्य मध्ये समाजाची सुमारे 50 ते 60 हजार मतदारांची संख्या आहे आणि हा मतदार कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाने मोची समाजाला आमदारकीची संधी द्यावी यासाठी समाजातील कार्यकर्ते उत्साही झाले आहेत मोची समाजातून  माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे हे इच्छुक आहेत. 
आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून आता मोची समाज आक्रमक झाला असून बुधवारी हॉटेल कामत मध्ये मोची समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महापालिकेचे माजी सभागृह नेते समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देवेंद्र भंडारे, संजय हेमगड्डी आणि बाबा करगुळे हे तिघे शहर मध्य मधून काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असून इतर कुणीही इच्छुक असतील त्या सर्वांनी मागणी करा, ज्यांना उमेदवारी मिळेल समाज म्हणून त्याच्या पाठीशी राहायचे ठरले आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची तीन ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांना समाजाच्या वतीने निवेदन द्यायचे आणि इच्छुकांपैकी एकाला काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी मागणी करायचे ठरले आहे.