#

Advertisement

Monday, July 29, 2024, July 29, 2024 WIB
Last Updated 2024-07-29T11:49:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार ३ ऑगस्टला पंढरपुरात : काळे झेंडे दाखवणार

Advertisement
पंढरपूर : शरद पवार यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्यापूर्वी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. 3 ऑगस्ट रोजी शरद पवार शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनसाठी पंढरपूरमध्ये येत आहेत. त्यापूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे की न द्यावे याबाबत सांगावे, असं ओबीसी संघटनांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी त्यापूर्वी भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.
राठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास अनेक ओबीसी नेते विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटलांकडून सग्या सोयऱ्यांनाही आरक्षणाअंतर्गत घ्यावे अशी मागणी केली जात असताना या मागणीलाही ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासहीत राज्यातील नेते छगन भुजबळ यांनी उघडपणे यावर आपली भूमिका मांडली आहे. आता या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात पंकजा मुंडेंनी शरद पवारांना एक सवाल केला आहे.  शरद पवार यांची भूमिका मोठी आहे, त्यामुळे त्यांनी या प्रश्नी आपले मत जाहीररीत्या मांडण्याची मागणी होत आई.