Advertisement
रविकांत तुपकर यांचा नवा पक्ष 25 जागांवर निवडणूक लढवणार
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या वादळ आलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक वर्ष काम करणारे नेते रविकांत तुपकर यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. आपल्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई ही धक्कादायक आहे, असं रविकांत तुपकर म्हणाले होते. यानंतर आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. रविकांत तुपकर यांनी पुण्यात आपल्या समर्थकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी आपल्या महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निलंबनाची कारवाई आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी नव्या संघटनेची घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांसोबतबैठकीनंतर रविकांत तुपकर यांनी आपला पक्ष हा येत्या निवडणुकीत 25 जागांवर निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली. रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी असं ठेवलं आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी संघटना बुलढाणा जिल्ह्यात विधानसभेच्या 6 जागा लढवणार आहे. विशेष म्हणजे लवकरच राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करणार, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.
