#

Advertisement

Monday, August 12, 2024, August 12, 2024 WIB
Last Updated 2024-08-12T12:04:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक

Advertisement

'कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये' 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 
सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, "अत्यंत महत्वाचे" असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली आहे. "माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. 
नेमका कोणी आणि कोणत्या कारणासाठी सुप्रिया सुळेंचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक केलं आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. मात्र सुप्रिया यांच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आल्याने आणि थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्याने यामागील व्यक्तींच्या नावासंदर्भात लवकरच खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.