#

Advertisement

Friday, September 27, 2024, September 27, 2024 WIB
Last Updated 2024-09-27T12:03:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढ्यातून शरद पवारांच्या मनात नेमकं कोण?

Advertisement

तुतारी मिळवण्यासाठी धडपड 
माढा : माढा विधानसभ मतदारसंघात इच्छुकांचे मोठे पीक आले असून सर्वच उमेदवार तुतारी मिळवण्यासाठी धडपड करु लागले आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवणे खुद्द शरद पवार  यांनांही डोकेदुखी ठरणार आहे. कारण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे अनेकजण शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
माढा मतदारसंघात तुतारी घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.  यात शिवतेसिहं मोहिते पाटील, शिवाजी कांबळे, अभिजित पाटील, संजय कोकाटे, धनराज शिंदे, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे , संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे,  असे अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत  त्यातच आता परिचारक गटाने उमेश परिचारक यांनी माढातून निवडणूक लढवण्याचा आग्रह सुरु केल्याने शिंदे याना हा धक्का असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावात जवळपास सव्वा लाख मतदान असून या भागात परिचारक गटाची मोठी ताकद आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यातील गावात परिचारक यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना असल्याने आम्ही माढा जिंकून दाखवू असा विश्वास परिचारक समर्थकांना आहे. जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक व शिंदे हे कायम एकत्र राहिल्याने अद्याप उमेश परिचारिकांनी समर्थकांच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .