Advertisement
विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला हलवले
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी पुणे येथे दौऱ्यावर होते. ताप आणि घशाचा संसर्ग असल्याने आज त्यांना अधिक त्रास जाणवल्याने मुंबईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
