#

Advertisement

Wednesday, October 2, 2024, October 02, 2024 WIB
Last Updated 2024-10-02T11:45:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांविरुद्ध तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुणाल दराडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे, येवला मतदारसंघात कुणाल दराडेंना उमेदवारी भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे आणि त्यांचे पुतणे कुणाल दराडे आणि जयंत पाटील यांच्यात वीस मिनिटं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. कुणाल दराडे आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सूत्रांची माहिती आहे. याआधी देखील एकदा दराडे कुटुंबीयांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. आता, ऐन निवडणुकांच्या तोंडावर भेट घेतल्याने येवला मतदारसंघातून त्यांची महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार कोण असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यातच, आज कुणाल दराडे यांनी भेट घेतल्याने दराडे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगणार असल्याचे दिसून येते.