#

Advertisement

Friday, January 17, 2025, January 17, 2025 WIB
Last Updated 2025-01-17T12:22:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रयागराजमध्ये 45 दिवसांत 45 कोटी भाविक

Advertisement

कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी 

प्रयागराज : कुंभमेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हे मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. 14 जानेवारीच्या दिवशी 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी संगमात डुबकी घेतली. पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या मोजण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. या मेळ्यात 200 जागांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. संपूर्ण प्रयागराज शहरात 268 जागांवर एकूण 1107 जागी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. 100 हून अधिक पार्किंगच्या जागांवर 700 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. याद्वारे वाहनांची आणि भाविकांची गणना केली जात आहे. भाविकांच्या संख्येचा अंदाज त्यांनी आणलेल्या होड्या, ट्रेन, बस आणि खासगी वाहनांची गणना करुन लावण्यात येतो. साधु संत आणि आखाड्यात आलेल्या भक्तांची संख्या यात जोडली जाते.
2013 च्या आधी भाविकांची गणना डीएम आणि एसएसपीच्या अहवालारुन ठरवायची. यात बस, ट्रेन आणि खासगी वाहनांच्या आकड्याचा समावेश असायत. याआधी गणना थोडी सोपी असायची.पण वाढती लोकसंख्या आणि शहरांची रहदारीचे कठोर निर्बंध यामुळे मोजणी किचकट झाली आहे. डीडब्ल्यूच्या एका रिपोर्टनुसार, 2013 च्या कुंभमध्ये पहिल्यांदाच कुंभमध्ये सांख्यिकी पद्धतीचा वापर करण्यात आला. स्नानासाठी महत्वाची जागा आणि वेळ आदार मानला गेला. आकड्यांनुसार, एका व्यक्तीला स्नानासाठी 0.25 मीटर जागा आणि 15 मिनिटांचा वेळ लागतो.अशाप्रकारे एका तासात एका घाटावर साधारण 12 हजार 500 लोकं आंघोळ करु शकतात. यावर्षी प्रयागराजमध्ये 44 घाटांवर स्नान करता येणार आहे. या घाटांवर सलग 18 तास स्नान झाले तर प्रशासनाने दिलेल्या आकड्यानुसार ही संख्या खूप कमी बसू शकते.